बुधवार, १८ मार्च, २००९

तुकयाचा हंबरडा

तुकोबांच्या ओवीवर आधारित मायबोलीवर ही एक कविता सापडली.

हवें होते आम्हां । स्वैर मोकांटपण
दिले तुम्ही दान । स्वातंत्र्याचे ! ॥१॥
सत्तेचाळिस सालीं । ठोंकलेली पांचर
दुखें अनिवार । जीवघेणी ! ॥२॥
तुम्ही जातां, आले । लफंग्यांचे पीक
बसले संस्थानिक । बोकांडीला ॥३॥
नाही तोंडलेल्या । लचक्यांचे वावडे
सोंकावलीं गिधाडें । इंग्रजांनों ॥४॥
’बापूं’ नी दिलेले । ’खादी’ चें व्रत
टगे, निष्ठावन्त । आचरतीं ॥५॥
कुंकवाला धनी । लाभलेंत गुंड
करीतीं अखंड । बलात्कार ॥६॥
भ्रष्ट स्वराज्यांत । खातो आम्ही गोळ्या
भाजती हें पोळ्या। चितांवरीं ! ॥७॥
नसे लागूं यांना । ’पोटा- मोक्का-टाडा’
हाणा, सोंटा तगडा । पेंकाटांत ! ॥८॥
बळी आज गेले । निष्ठावान पोलीस
उद्याचे ’ओलीस’ । तुम्ही-आम्ही !! ॥९॥
ओंसरीत उभें । वास्तव दाहक
मारूं कुणां हांक? । आंकळेना ॥१०॥
लोंकशाही, इथे । झाली निर्नायकी
जगायची लायकी । गुलामीत ! ॥११॥
स्वीय करणीचें । फेंडतो हे पाप
असले ’मायबाप’ । दिले देवा ॥१२॥
फोडूं शासनाच्या । माथीं, हें खांपर
चुकवीत आयकर । हिरीरीने !! ॥१३॥
शिकलो आम्हीही । पैसा ओंढाया
कायदे तोडाया । यथाशक्ती ! ॥१४॥
गुदमरतो जीव । शिस्तपालनांत
कश्याशी खातांत । नीतिमत्ता ? ॥१५॥
बसविले आम्हीच । निवडून चोंर
दरवडेखोर । संसदेंत ॥१६॥
भ्रष्ट जनतेला । भामटे पुढारी
वाली, कोंण तारी । रामशास्त्री ? ॥१७॥
होईना निर्मळ । सारवून, अंगण
केली आम्ही घाण । सुखेनैव ! ॥१८॥
बरे होतो आम्ही । नेकीनें चालत
लाथाबुक्क्या खांत । पार्श्वभागीं !! ॥१९॥
हुतात्म्यानों, स्वर्गीं। फोडा हंबरडा
वृथा दिला लढा। स्वातंत्र्याचा !!! ॥२०॥
************---- रविशंकर.

गुरुवार, ५ फेब्रुवारी, २००९

तुकोबांचा प्रभाव कोणावर?

तुकोबांचा प्रभाव कोणावर?
29 Jan 2009, 2232 hrs IST
लोकमान्य टिळकांनी क्लास आणि मास यांचा समन्वय केला, त्यामागे तुकोबांचा आदर्श असावा. गीतारहस्यात सर्वाधिक वीस को
टेशन्स तुकाराम महाराजांचीच आहेत. या महान ग्रंथाची सुरुवातच 'संतांची उच्छिष्टे...' या तुकारामांच्या अभंगाने केली आहे. - - - - न्यायमूतीर् रानडेंनी महाराष्ट्रात आधुनिक विचारांचा पाया प्रार्थना समाजाच्या रूपाने मांडला. त्यात आधार म्हणून तुकारामांचंच तत्त्वज्ञान होतं. एवढंच नाही, तर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांपासून दादोबा पांडुरंग आणि महात्मा फुलेंपासून महषीर् विठ्ठल रामजी शिंदेंपर्यंत अनेक समाजसुधारकांवर तुकोबांचा थेट प्रभाव होता. गांधीजींवर तुकोबांचा प्रभाव होताच. त्यांनी येरवडा जेलमधे असताना तुकोबांच्या १६ अभंगांचं भाषांतर केलं होतं. त्यांची प्रसिद्ध तीन माकडं तुकारामांच्याच अभंगांवर बेतली आहेत. त्यांनीच गाथा हिंदीत आणण्यासाठी प्रयत्न केले. त्याला प्रस्तावनाही लिहिली. गांधीजींप्रमाणेच रवींदनाथ टागोरांनी तुकोबांच्या १२ अभंगांचा बंगालीत अनुवाद केलाय. त्यांचे थोरले बंधू सत्यंेदनाथ तर तुकोबांचे मोठेच चाहते होते. त्यांनी ६० अभंग भाषांतरित केले आहेत. शिवाय चरित्रही लिहिलं आहे. ते तुकोबांवर प्रवचनंही देत. शांतिनिकेतनमधले ज्येष्ठ चित्रकार नंदलाल बोस यांनी तुकारामांची चित्रं काढली होती. बंगाली संस्कृतीचा मराठीवर प्रभाव आहेच. पण तुकोबांसारख्या संतकवीचा बंगालवरही प्रभाव आहे. तो इतका, की विख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी तुकोबांचं सुंदर रेखाचित्र काढलंय. अश्विनीकुमार दत्त हे आताच्या बांगलादेशातील प्रसिद्ध स्वातंत्र्यसेनानींना स्वातंत्र्यावर कविता रचण्याची प्रेरणा मिळाली ती तुकाराम गाथेतून. प्रख्यात गायिका भारतरत्न एम. सुब्बलक्ष्मी यांच्या दिवाणखान्यात तुकारामांचा भव्य फोटो होता. प्रत्येक मैफलीत त्या तुकारामांचा एक तरी अभंग त्या गात असत. 'सुंदर ते ध्यान' आणि 'बा रे पांडुरंगा' हे त्यांचे आवडते अभंग. अगदी अमेरिकेतल्या त्यांच्या मैफलीतही तुकोबांच्या अभंगांनी हजेरी लावलीच. फक्त सुब्बालक्ष्मीच नाही तर तामिळनाडूतील सर्वच पारंपरिक भजनीमंडळं भजनाचा समारोप तुकारामांच्या दोन अभंगांनी करतात. ज्येष्ठ ख्रिश्चन धर्मगुरू आणि 'सुवार्ता'चे संपादक बिशप डॉ. थॉमस डाबरे यांनी तुकारामांच्या वैकुंठगमन सोहळ्याविषयी व्हॅटिकन सिटीत पेपर वाचला होता. त्यांची डॉक्टरेटही एक्स्पिरियन्स ऑॅफ तुकाराम याच विषयावर आहे.

सोमवार, २ फेब्रुवारी, २००९

विज्ञानात झेप कशी घेता येईल?

विज्ञानात झेप कशी घेता येईल?
डॉ. रघुनाथ माशेलकर
Thursday, January 08th, 2009 AT 7:01 PM
(Taken from Sakal News-Paper.)
"इंडियन नॅशनल सायन्स ऍकॅडमी'चा (इन्सा) यंदा अमृत महोत्सव आहे. शनिवारी नवी दिल्लीत त्याचा कार्यक्रमही होणार आहे. त्या निमित्ताने देशातील विज्ञान संशोधनावर टाकलेला दृष्टिक्षेप.. निसर्गाशी समरस होत मानवी विकास साध्य करण्याचा प्रयत्न भारतात अगदी प्राचीन काळापासून होत आला आहे. किंबहुना भारतीय संस्कृतीचे हे एक वैशिष्ट्यच आहे. निसर्गाशी समरस होतानाच त्याचे निरीक्षण, त्याचा अभ्यास होत गेला. त्याद्वारे विज्ञानातील मूलभूत बाबी समजून घेण्याचाही प्रयत्न झाला. म्हणूनच प्राचीन काळात आपल्याकडे काही वैज्ञानिक निरीक्षणे नोंदविली गेली; मात्र मधल्या काळात आपल्याकडील विज्ञान मागे पडले. ब्रिटिश राजवटीत विद्यापीठे सुरू झाली खरी; परंतु ती प्रामुख्याने ब्रिटिशांना पूरक अशा मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी. त्यामुळे विज्ञान संशोधनाला पूरक- पोषक वातावरण नव्हते. मात्र, अशाही स्थितीत एस. एन. बोस, जगदीशचंद्र बोस, मेघनाद साहा, सी. व्ही. रामन यांच्यासारख्या शास्त्रज्ञांनी आपला ठसा उमटविला.

१९३० चे दशक तर भारतातील विज्ञानासाठी प्रबोधनाचेच होते. रामन यांच्या "रामन परिमाणा'च्या सिद्धांताने साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले. त्याला नोबेल पारितोषिकही मिळाले. बिनतारी संदेश यंत्रणेच्या बाबतीत जगदीशचंद्र बोस यांनी अग्रणी काम केले. मार्कोनी यांच्याही आधी त्यांनी याबाबतचे संशोधन केले होते. मात्र, मार्कोनीने पेटंट घेतले- जगदीशचंद्रांनी ते केले नाही! "थर्मल आयोनायझेशन'बाबतचे समीकरण मांडून साहा यांनी खगोल भौतिकीचा पाया रचला. के. एस. कृष्णन यांनी चुंबकशास्त्रात मूलभूत काम केले. भारतातील विज्ञानासाठी तीसचे दशक हे असे होते. याच काळात "सायन्स ऍकॅडमी'ची स्थापना होणे, हे म्हणून आश्‍चर्यकारक ठरत नाही. लंडन येथील "रॉयल सोसायटी'च्या धर्तीवर भारतातही एक "ऍकॅडमी' असावी, अशी सूचना १९३४ च्या "सायन्स कॉंग्रेस'मध्ये मेघनाद साहा यांनी केली होती. त्याची लगेचच अंमलबजावणी झाली आणि "नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस ऑफ इंडिया'चा (एनआयएसआय- निसी) जन्म झाला. १९३५ च्या जानेवारीत त्या वेळचे बंगालचे गव्हर्नर सर जॉन अँडरसन यांच्या हस्ते त्याचे उद्‌घाटन झाले. पुढे १९४५ मध्ये भारत सरकारने या संस्थेला मान्यता दिली आणि भारतीय विज्ञानासाठी ती एक "थिंक टॅंक' म्हणून काम करेल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना सन्माननीय सदस्यत्व (फेलो) देण्यात आले. १९७० मध्ये या संस्थेचे "इंडियन नॅशनल सायन्स ऍकॅडमी' (इन्सा) असे नामांतर करण्यात आले. तिचा अमृत महोत्सव यंदा साजरा केला जात आहे. "इन्सा'ची उपक्रमशीलता भारतातील विज्ञान प्रसारासाठी, तसेच वैज्ञानिक गुणवत्ता हेरण्यासाठी "इन्सा'ने केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. त्याचबरोबर विज्ञानाच्या आणि शास्त्रज्ञांच्या हिताचे रक्षण करण्याचा प्रयत्नही तिने केला आहे. देशातील विज्ञान संशोधनाला पूरक अशी भूमिका तिने बजावली आहे. तरुण संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी तिने उपक्रमशील पावले उचलली. "इन्सा मेडल फॉर यंग सायंटिस्ट' हे त्याचे उदाहरण. संयुक्त राष्ट्रांनी ज्याप्रमाणे "यूएन सायन्स रिपोर्ट' प्रसिद्ध केला होता, त्याप्रमाणे "इन्सा'नेही "इंडियन सायन्स रिपोर्ट' दोन वर्षांपूर्वी तयार केला. देशातील विज्ञान शिक्षण, मनुष्यबळ आणि एकूणच विज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन यांबाबतच्या प्रश्‍नावर तिने या अहवालाद्वारे चर्चा केली होती. "इन्सा'च्या "फेलोशिप'लाही एक दर्जा प्राप्त झाला आहे. आतापर्यंतच्या वाटचालीत तिने सुमारे दीड हजार शास्त्रज्ञांना "फेलोशिप' देऊ केली आहे. साहा, सत्येन बोस, शांतिस्वरूप भटनागर, होमी भाभा, राजा रामण्णा, सी. एन. आर. राव यांसारख्या शास्त्रज्ञांनी तिचे अध्यक्षपद भूषविले आहे. "इन्सा'च्या या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने देशातील विज्ञान शिक्षण आणि संशोधनाबाबत विचार करणे, चर्चा करणे आणि संशोधनाचा दर्जा उंचावण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांत भारताने जगात आपली स्वतःची एक प्रतिमा निर्माण केली आहे. जगाचाही भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे.

नजीकच्या भविष्यात काही क्षेत्रांमध्ये भारत अव्वल स्थान प्राप्त करू शकतो. पूरक आणि पोषक वातावरण निर्माण झाल्यास आणि प्रज्ञावंत मुलांना विज्ञानाकडे आकर्षित केल्यास संशोधनाच्या क्षेत्रात भारत अग्रेसर होऊ शकेल. अर्थात त्यासाठी शालेय शिक्षणापासून अनेक बदल करावे लागतील. मुख्य म्हणजे मुलांमधील कुतूहल, उत्सुकता सतत जागरुक ठेवावी लागेल. सध्या नेमके उलटे केले जाते. विज्ञान शिक्षणात प्रयोग आणि निरीक्षणावर अधिक भर द्यावा लागेल. पण, या साऱ्यांच्याही आधी काही प्रश्‍नांची उत्तरे आपल्याला स्वतःलाच द्यावी लागतील. तो प्रश्‍न म्हणजे- आपल्याकडे पुरेसे शास्त्रज्ञ तयार केले जातात काय? आपल्याकडे उच्च दर्जा असलेल्या पुरेशा संस्था आहेत काय? बेंगळरुमध्ये "इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स' (आयआयएस्सी) आहे. तिचा चांगला दबदबा आहे. ती यंदा शताब्दी साजरी करीत आहे. गेल्या शंभर वर्षांत दुसरी "आयआयएस्सी' निर्माण करू शकलो नाही, असा याचा अर्थ होतो. अर्थात तीन वर्षांपूर्वी पुणे, कोलकाता आणि मोहाली येथे "इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च'ची (आयआयएसईआर) स्थापना करून पुढचे पाऊल टाकण्यात आले आहे. आता आणखी पाच "आयआयएसईआर'ची स्थापन केली जाणार आहे. माहिती तंत्रज्ञान आणि अन्य क्षेत्रांत करिअरच्या आकर्षक संधी निर्माण होत असताना किती तरुणांचा कल विज्ञानाकडे आहे? त्यांना संशोधनाकडे आकर्षित करण्यासाठी काय केले जात आहे? पंतप्रधांनी अलीकडेच "इन्स्पायर' हा उपक्रम जाहीर केला आहे. लाखो विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी घसघशीत शिष्यवृत्तीही दिली जाणार आहे. प्रज्ञावंत मुलांना विज्ञानाकडे आणण्यासाठी असे प्रयत्न व्हायला हवेतच. त्यांनी विज्ञान संशोधनातच करिअर करावे यासाठीही प्रयत्न व्हायला हवेत; मात्र, तसे होताना दिसत नाही. विज्ञान ऑलिम्पियाड स्पर्धांत भारतीय मुले सुवर्णपदकांची लयलूट करतात; परंतु पुढे ती संशोधनाकडे वळत नाहीत. करिअरसाठी अन्य क्षेत्रांत जातात. एक प्रकारे भारतातील विज्ञान या प्रज्ञावंतांना गमावते. इतर देशांत असे घडत नाही. भारताची कामगिरी आणखी एक मुद्दा आहे, तो विज्ञानाच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली कामगिरी कशी आहे, याचा. जगातील एकूण लोकसंख्येपैकी २० टक्के लोक भारतात राहतात; मात्र वैज्ञानिक संशोधन निबंधांमध्ये भारताचा वाटा केवळ २.२५ टक्के आहे! ब्रिटनचे जागतिक लोकसंख्येशी असलेले प्रमाण एक टक्का आहे; परंतु जागतिक शोधनिबंधांशी त्याचे असलेले प्रमाण आठ टक्के आहे. याबाबत चीनसारखे देश वेगाने प्रगती करीत आहेत. १९९६ मध्ये चीनच्या शोधनिबंधांचे प्रमाण १.४ टक्के होते. त्या वेळी भारताचे प्रमाण १.५३ टक्के होते.

आज चीनने भारताला मागे टाकले आहे. भारताचे प्रमाण २.२५ टक्के, तर चीनचे ६.३४ टक्के आहे! केवळ शोधनिबंधांची संख्या वाढवूनही चालणार नाही; त्यांचा दर्जाही उंचावला पाहिजे. त्यासाठी विज्ञानाच्या क्षेत्रातील आपली स्पर्धात्मकता वाढवावी लागेल; अन्यथा अनेक देश आपल्या मागून पुढे जातील. गेल्या वर्षी भारताने "चांद्रयान' मोहीम यशस्वी केली. चंद्राच्या दिशेने भारताचे यान झेपावले आणि त्यातून पाठविलेली कुपी चांद्रभूमीवर उतरलीही. भारतीय शास्त्रज्ञांचे हे मोठे यश आहे. अमेरिकेशी अणुकरार करून आपण एक पाऊल पुढे टाकले आहे. "एका सुपरकॉम्प्युटर'ची निर्मितीही आपल्याकडे झाली आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अशा प्रकारे भारत एकेक पायरी गाठत आहे. मोठी झेप घेण्यासाठी आपल्याला विज्ञानाचा- संशोधनाचा पाया विस्तृत करावा लागेल. "इन्सा'च्या अमृत महोत्सवानिमित्त हा विचार आपण केला पाहिजे. त्याचबरोबर, "इन्सा'चा जन्म झाला, त्या तीसच्या दशकामधील तो सुवर्णकाळ पुन्हा कसा निर्माण करता येईल आणि साहा, बोस, रामन, जगदीशचंद्र बोस यांच्यासारखे शास्त्रज्ञ कसे निर्माण होतील, हे प्रश्‍न उपस्थित केले पाहिजेत. त्यांच्या उत्तरांतूनच आपल्याला विज्ञानात मोठी झेप घेता येईल.

-डॉ. रघुनाथ माशेलकर (लेखक "इन्सा'चे माजी अध्यक्ष आहेत.)

मंगळवार, ३० डिसेंबर, २००८

मला आलेला एक ईनोदी मेल.....

आम्ही आणि क्रेडिट कार्ड वाली कन्या !!

आपण कुठल्या ना कुठल्या कामात असताना ह्या क्रेडिट कार्ड वाल्यांचा फोन येत नाही असे होत नाही. आधि मला सुध्दा संताप यायचा पण मग आता आम्ही ह्याचा आनंद घ्यायला शिकलो आहे, आणी आता तर आमची खात्रीच झाली आहे कि हे फोन आम्हाला तणावमुक्त करण्यासाठीच येतात. आपल्यालाहि ह्यातुन काही फायदा व्हावा ह्या सदहेतुने आमचे संभाषण येथे देत आहोत. (ह्यात कोणालाहि दुखवायचा हेतु नाही.)
वेळ :- दुपारी २.१५ (गरगरित जेवण करुन नुकतेच आडवे झालो आहोत)
कन्या :- गुड आफ्टरनून सर, आय एम कॉलींग फ्रॉम दरोडा बॅंक.
आम्ही :- जय महाराष्ट्र ! (पहिल्याच चेंडुवर षटकार)
कन्या :- नमस्ते सर, मी दरोडा बॅंकेमधुन बोलतीये, आम्ही एक नविन क्रेडिट कार्ड लॉंच करतोय त्या विषयी माहिति द्यायला हा फोन केला होता सर. तुम्ही इंट्रेस्टेड आहात का सर ?
आम्ही :- कोणाच्यात ?
कन्या :- सर कार्डमध्ये हो
आम्ही :- ओह्ह अच्छा , काय आहे ना कि आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी येवढ्या गोड आवाजात इंट्रेस्टेड आहात का ? असे विचारले हो, त्यामुळे जरा गोंधळ उडाला बघा.
कन्या :- (मनातल्या मनात खुश झाली असावी) मग सर तुम्हाला कधि वेळ आहे ?
आम्ही :- अहो तुमच्या साठी वेळच वेळ आहे आमच्याकडे !
कन्या :- तसे नाही सर, ह्या कार्ड विषयी माहिती देण्यासाठी.
आम्ही :- अहो असे मला गोंधळवु नका हो, एक तर सुंदर मुलीशी बोलायचे म्हणजे आमची आधिच वाचा बसते. मला सांगा तुमच्याच कार्डची माहिती मी तुम्हाला कशी आणी का द्यायची ?
कन्या :- (डबल खुश होत ) अय्या अहो सर म्हणजे तुम्हाला कधी वेळ आहे ? आमचा प्रतिनिधी येउन तुम्हाला पुर्ण माहिती देइल.
आम्ही :- एक प्रश्न विचारतो रागवु नका, तुमचे नाव मंजिरी आहे का हो ? आणी तुम्ही अहिल्यादेवी शाळेत होता का ?
कन्या :- नाही ! आपण कार्ड विषयी बोलुयात का ?
आम्ही :- बघा रागवलात ना तुम्ही ? आहो एक खुप चांगली मैत्रिण होती हो माझी ह्या नावाची, अगदी असाच गोड आवाज आणी असेच जड जड मराठी शब्द वापरायची सवय होती हो तिला. तुमचा आवाज ऐकला आणी तिच आठवली बघा पटकन, माफ़ करा मला. म्हणतात ना आपली दुख: हि लोकासाठी विनोद असतात तेच खरे.
कन्या :- (भावुक स्वरात) नाही रागावले नाही सर. कुठे असतात त्या आता ? त्या पण बॅंकेत असतात का ?
आम्ही :- नाही हो, लहानपणीचा ताटातुट झाली आमची, कुठे आहे काय करते ... काही काही माहीत नाही हो. (आम्ही जमेल तेव्हड्या दु:खी सुरात)
कन्या :- (चिकाटी न सोडता) ओह, सो सॉरी सर. आज वेळ काढु शकाल का सर तुम्ही ?
आम्ही :- हो जरूर, तुम्हाला भेटुन आनंदच होइल मला. पुन्हा त्या जुन्या आठवणी ताज्या होतील आणी मग आज तरी निदान दारू ची गरज लागणार नाही मला... (फुल्ल टु देवदास इस्टायील)
कन्या :- सर, मला भेटुन ? आमचा त्या भागातला एजंट येउन भेटेल सर तुम्हाला. मी नाही. (हळु हळु कन्या त्रासीक स्वरात बोलायला लागली आहे.)
आम्ही :- अरे असे कसे ? फोन करणार तुम्ही, वेळ देणार आम्ही तुम्हाला, आणी तो का भेटायला येणार ? मेहनत करे मुर्गा आपले मुर्गी आणी अंडा खाये फकीर ?
कन्या :- (प्रचंड नाराजीने) सर, आम्ही फक्त कॉल सेंटर साठी काम करतो. लोकांना भेटण्यासाठी वेगळी माणसे नेमली आहेत.
आम्ही :- अच्छा म्हणजे फोनवर टोप्या घालणारी आणी प्रत्यक्षात टोप्या घालणारी वेगवेगळी माणसे आहेत तर !!
कन्या :- पार्डन सर ?? (आतुन संतापाचे स्फोट होत असावेत त्यामुळे कन्या परत इंग्लिश वर घसरली आहे)
आम्ही :- नाही म्हणजे तुमच्या भेटिचा योग नाहीच म्हणा की, काये मन कसे वेडे असते बघा, लगेच तुमच्या भेटीची स्वप्न रंगवुन तय्यार. लबाड कुठले !
कन्या :- सर सध्या तुम्ही कुठले कार्ड वापरत आहात ?
आम्ही :- नेटवाला.कॉम चे. पण ४ वर्ष झाली अजुन कसे आणी कुठे वापरायचे ते कळाले नाहिये.
कन्या :- सर, मी क्रेडिट कार्ड बद्दल बोलत आहे.
आम्ही :- हो, ते तुम्ही फोन उचलल्या उचलल्या सांगीतलेत की !
कन्या :- सर, आय मिन सध्या तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड वापरता ?
आम्ही :- अहो रेशन कार्ड नाहिये माझ्याकडे अजुन, क्रेडिट कार्ड बद्दल काय विचारताय ? पण खरच आपण नाहि का हो भेटु शकणार ? अगदी तुमच्या सोयीच्या वेळी.
कन्या :- सर तुम्हाला कार्ड हवे आहे का ? मला बाकीच्या ग्राहकांना सुध्दा फोन करायचे आहेत. प्लिज कार्ड विषयी बोला.
आम्ही :- तुम्ही तुमचे काम उरकुन घ्या ना निवांत. माझा नंबर तर आहेच तुमच्याकडे, संध्याकाळी तुम्ही मोकळ्या झाल्यात की मग एक मिस कॉल द्या, मी करतो तुम्हाला फोन.
(पलिकडुन असभ्य काहितरी पुटपुटल्याचे ऐकु येउन खाडकन फोन आदळला जातो.)