गुरुवार, ५ फेब्रुवारी, २००९

तुकोबांचा प्रभाव कोणावर?

तुकोबांचा प्रभाव कोणावर?
29 Jan 2009, 2232 hrs IST
लोकमान्य टिळकांनी क्लास आणि मास यांचा समन्वय केला, त्यामागे तुकोबांचा आदर्श असावा. गीतारहस्यात सर्वाधिक वीस को
टेशन्स तुकाराम महाराजांचीच आहेत. या महान ग्रंथाची सुरुवातच 'संतांची उच्छिष्टे...' या तुकारामांच्या अभंगाने केली आहे. - - - - न्यायमूतीर् रानडेंनी महाराष्ट्रात आधुनिक विचारांचा पाया प्रार्थना समाजाच्या रूपाने मांडला. त्यात आधार म्हणून तुकारामांचंच तत्त्वज्ञान होतं. एवढंच नाही, तर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांपासून दादोबा पांडुरंग आणि महात्मा फुलेंपासून महषीर् विठ्ठल रामजी शिंदेंपर्यंत अनेक समाजसुधारकांवर तुकोबांचा थेट प्रभाव होता. गांधीजींवर तुकोबांचा प्रभाव होताच. त्यांनी येरवडा जेलमधे असताना तुकोबांच्या १६ अभंगांचं भाषांतर केलं होतं. त्यांची प्रसिद्ध तीन माकडं तुकारामांच्याच अभंगांवर बेतली आहेत. त्यांनीच गाथा हिंदीत आणण्यासाठी प्रयत्न केले. त्याला प्रस्तावनाही लिहिली. गांधीजींप्रमाणेच रवींदनाथ टागोरांनी तुकोबांच्या १२ अभंगांचा बंगालीत अनुवाद केलाय. त्यांचे थोरले बंधू सत्यंेदनाथ तर तुकोबांचे मोठेच चाहते होते. त्यांनी ६० अभंग भाषांतरित केले आहेत. शिवाय चरित्रही लिहिलं आहे. ते तुकोबांवर प्रवचनंही देत. शांतिनिकेतनमधले ज्येष्ठ चित्रकार नंदलाल बोस यांनी तुकारामांची चित्रं काढली होती. बंगाली संस्कृतीचा मराठीवर प्रभाव आहेच. पण तुकोबांसारख्या संतकवीचा बंगालवरही प्रभाव आहे. तो इतका, की विख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी तुकोबांचं सुंदर रेखाचित्र काढलंय. अश्विनीकुमार दत्त हे आताच्या बांगलादेशातील प्रसिद्ध स्वातंत्र्यसेनानींना स्वातंत्र्यावर कविता रचण्याची प्रेरणा मिळाली ती तुकाराम गाथेतून. प्रख्यात गायिका भारतरत्न एम. सुब्बलक्ष्मी यांच्या दिवाणखान्यात तुकारामांचा भव्य फोटो होता. प्रत्येक मैफलीत त्या तुकारामांचा एक तरी अभंग त्या गात असत. 'सुंदर ते ध्यान' आणि 'बा रे पांडुरंगा' हे त्यांचे आवडते अभंग. अगदी अमेरिकेतल्या त्यांच्या मैफलीतही तुकोबांच्या अभंगांनी हजेरी लावलीच. फक्त सुब्बालक्ष्मीच नाही तर तामिळनाडूतील सर्वच पारंपरिक भजनीमंडळं भजनाचा समारोप तुकारामांच्या दोन अभंगांनी करतात. ज्येष्ठ ख्रिश्चन धर्मगुरू आणि 'सुवार्ता'चे संपादक बिशप डॉ. थॉमस डाबरे यांनी तुकारामांच्या वैकुंठगमन सोहळ्याविषयी व्हॅटिकन सिटीत पेपर वाचला होता. त्यांची डॉक्टरेटही एक्स्पिरियन्स ऑॅफ तुकाराम याच विषयावर आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: